डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागांत महात्मा गांधी रस्ता, पूर्व भागातील रामनगरमधील शिवमंदिर परिसरातील सीमेंट रस्त्यांची कामे अतिशय संथगतीने सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
महात्मा गांधी रस्त्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. अतिशय संथगतीने हे काम सुरू आहे. रस्त्यांमध्येच पत्रे लावून ठेवण्यात आले आहेत. एकेरी वाहतूक सुरू असल्याने या रस्त्यामध्ये एकही खडी शिल्लक राहिलेली नाही. एका बाजूला सीमेंट रस्त्यासाठी फक्त खोदाई आणि डांबरीकरण करून ठेवण्यात आले आहे. याच रस्त्यावरून एका बाजूने नागरिक, वाहने, रिक्षा, शालेय विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. पालिका अधिकारी, ठेकेदाराचे या कामाकडे अजिबात लक्ष नाही. स्थानिक नगरसेवक या कामाविषयी उदासीन असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पूर्व भागात शिवमंदिर रस्त्याला रखडलेल्या स्थितीत कामे करून ठेवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही प्रभागांचे नगरसेवक मनसेचे आहेत. त्यांचे नवनिर्माण करते काय असे प्रश्न उद्विग्नपणे नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

Story img Loader