माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पुढाकारातून गुरुवारी लोह्यात म्हणजे तब्बल ७ हजार २०० जणांनी रक्तदान केले. नांदेडच नव्हे तर मराठवाडय़ात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात एकाचवेळी रक्तदान होण्याची ही पहिलीच वेळ मानली जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
नांदेड जिल्ह्यात रक्ताचा मोठय़ा प्रमाणात तुटवडा असल्याने हे शिबिर जास्तीत जास्त कसे यशस्वी होईल, यासाठी गेल्या १५-२० दिवसांपासून चिखलीकर मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले होते. रक्तदान करणाऱ्यांचा विमा उतरविण्यात येईल, ज्या महिला रक्तदान करतील, त्यांचा साडीचोळी देऊन सन्मान करण्यात येईल, असे चिखलीकर यांनी स्पष्ट केले होते. त्याचाच परिणाम आजच्या रक्तदान शिबिरात जाणवला. लोहा येथील पवार जििनग फॅक्टरीच्या मदानात शिबिरासाठी भव्य मंडप उभारण्यात आला होता. रक्तदानासाठी आलेल्या दात्यांची गरसोय होऊ नये, यासाठी नांदेड, िहगोली, लातूर, नाशिक, परभणी येथील रक्तपेढय़ांचे डॉक्टर रक्तसंकलनासाठी आले होते. सकाळी आठ वाजल्यापासूनच रक्तदात्यांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी पाच वाजेपर्यंत तब्बल ७ हजार २०० जणांनी रक्तदान केले. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या ७३व्या वाढदिवसानिमित्त हा संकल्प चिखलीकर समर्थकांनी केला होता. हा संकल्प निश्चितच यशस्वी झाल्याचे मानले जाते. राजकारणातल्या अपयशाने खचून न जाता समाजकारणात आपला ठसा कायम ठेवणाऱ्या चिखलीकर यांच्या या संकल्पनेचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी कौतुक केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा