सरकारी कार्यालयात जाऊन तक्रार करण्याची आता गरज राहिली नाही. जिल्हा प्रशासनाने जनतेला घरबसल्या इंटरनेटवरून तक्रार नोंदविण्याची सुविधा सुरू केली आहे. ई-लोकशाही सेवेच्या माध्यमातून दूरध्वनी व मोबाईलद्वारे आपली तक्रार नोंदवता येणार आहे. त्यामुळे जनतेचा वेळ व पैसा वाचून प्रशासनाला गती मिळेल, अशी अपेक्षा निवासी उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे यांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत राष्ट्रीय सूचना व विज्ञान केंद्र येथे ई-लोकशाही या नवीन सेवेचा प्रारंभ निवासी उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला.०२४४२-२३११०० या दूरध्वनी क्रमांकावर थेट तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.

Story img Loader