राज्यातील झोपडपट्टीधारकांच्या संदर्भात आजपर्यंत काढण्यात आलेले शासन निर्णय तसेच झोपडपट्टीधारकांसाठी असणाऱ्या शासनाच्या विविध योजनांची माहिती असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन येथे केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या झाले.
पुस्तिकेमध्ये १९९५ पर्यंतच्या झोपडपट्टय़ा नियमित करणे. राज्यातील झोपडपट्टीधारकांना ओळखपत्र देणे, झोपडपट्टय़ांना आहे त्याच ठिकाणी एसआरए योजनेच्या माध्यमातून घरकुल देणे, यासह विविध शासन निर्णयांचा समावेश आहे. याशिवाय शासनाचे आधार कार्ड, रेशन कार्ड, विधवा तसेच वृद्ध निराधारांसाठीच्या योजना, श्रावणबाळ योजना शहरी तसेच ग्रामीण भागासाठी असलेल्या इंदिरा आवास, राजीव गांधी ग्रामीण निवारा, दलितांना सरकारी घरे देणे, दलित वस्ती सुधार, महिलांना पाच लाखपर्यंतची आर्थिक सहाय्य देणारी सुवर्ण जयंती शहरी व ग्रामीण योजना, गरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, दलित, आदिवासी, भटके विमुक्त, मुस्लीम, ओबीसींसाठी असणाऱ्या शासनाच्या मागासवर्गीय महामंडळांच्या आर्थिक सहाय्याच्या विविध योजना, शैक्षणिक कर्जाच्या तसेच झोपडपट्टीधारकांसाठीच्या आरोग्य संदर्भातील विविध योजनांच्या माहितीचा समावेश आहे.
या वेळी आ. हेमंत टकले, राष्ट्रवादी काँग्रेस झोपडपट्टी विभागाचे प्रदेश अध्यक्ष संजय गालफाडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार आदी पदाधिकारी उपस्थित होते. झोपडपट्टीधारकांच्या प्रबोधनासाठी एक लाख मोफत पुस्तिकांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती गालफाडे यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा