‘दिवाळी पहाट’सारख्या उपक्रमांमधून संस्कृतीचे जतन होत असते, त्याचप्रमाणे, सर्वसमावेशक भावना वाढीस लागते, असे प्रतिपादन चिपळूण येथील नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले यांनी चिंचवड येथे केले.
चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात मसापच्या पिंपरी शाखेच्या वतीने ‘दिवाळी काव्य पहाट’चे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा कोतपल्ले यांनी आवर्जून हजेरी लावली. शहरातील नव्या-जुन्या कवींच्या कवितांचा आनंद घेतला आणि त्यांना मनमुराद दादही दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार लक्ष्मण जगताप होते. या वेळी माजी नगरसेवक राजू गोलांडे, राजन लाखे, प्रा. राजेंद्र कांकरिया, सुहास पोफळे आदी उपस्थित होते.
गोकुळ पवार, प्रकाश परदेशी, नितीन यादव, राजेंद्र घावटे, मीना िशदे, संजय जगताप, रघुनाथ पाटील यांच्यासह ४० कवींनी आपल्या कविता सादर केल्या. या वेळी आमदार जगताप यांच्या हस्ते कोत्तापल्ले यांचा सत्कार करण्यात आला. राजन लाखे यांनी प्रास्तविक केले. उपाध्यक्ष तुकाराम पाटील यांनी स्वागत केले. किरण लाखे यांनी सूत्रसंचालन केले.
‘लिटल चॅम्प’ वर रसिक फिदा
निगडी-प्राधिकरणातील गजानन महाराज मंदिरात उपमहापौर राजू मिसाळ यांच्या पुढाकाराने आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमात प्रथमेश लघाटे, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन, आर्या आंबेकर, रोहित राऊत या लिटल चॅम्पने सादर केलेल्या विविध गाण्यांवर रसिक मुग्ध झाले. सहा वर्षांच्या अभिनंदन याने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर सादर केलेल्या पोवाडय़ास सर्वानीच दाद दिली. कार्यक्रमास मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा