‘खलनायक’ या संजय दत्त-माधुरी दीक्षितच्या गाजलेल्या चित्रपटाच्या रिमेकबरोबरच घईंनी दिग्दर्शित केलेल्या १९७६ साली निर्माता एन एन सिप्पी यांच्या ‘कालीचरण’ या चित्रपटाचाही रिमेक घई करणार आहेत. या गाजलेल्या चित्रपटात शत्रुघ्न सिन्हा-रिना रॉय यांची जोडी होती. अभिनेता जॅकी श्रॉफ आणि मीनाक्षी शेषाद्री यांच्या गाजलेल्या ‘हिरो’ या प्रेमपटाचाही रिमेक करण्याचा विचार सुभाष घई गांभीर्याने करीत आहेत. या चित्रपटाने १९८३ साली १२ कोटी ५० लाखांचा गल्ला गोळा केला होता. जॅकीदादा हे जॅकी श्रॉफच्या व्यक्तिरेखेचे नाव होते आणि याच नावाने चित्रपटसृष्टीत जॅकी श्रॉफला नंतर संबोधले जाऊ लागले. १९८६ साली गाजलेल्या ‘कर्मा’ या दिलीपकुमार, नूतन, अनिल कपूर, श्रीदेवी, जॅकी श्रॉफ, नासिरुद्दीन शहा, अनुपम खेर, पूनम धिल्लाँ अशा बडय़ा स्टारकास्ट सुपरहिट चित्रपटाचाही रिमेक करण्याची शक्यता सुभाष घई यांनी व्यक्त केली आहे.
सध्या अनेक निर्माते-दिग्दर्शक १९८० च्या दशकातील चित्रपटांचे रिमेक करून पैसा कमावत आहेत. म्हणूनच आपल्याच ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रिमेक करून आपणही पैसे कमवावेत असा विचार करीत आहोत. आजच्या प्रेक्षकांना त्या काळातील चित्रपट कसे होते याची झलकही पाहायला मिळेल. अर्थात त्या काळच्या या चित्रपटांच्या पटकथेत आजच्या काळाला लागू पडतील असे बदल करून मगच रिमेक चित्रपटांची निर्मिती करणार आहोत, असेही सुभाष घई यांनी स्पष्ट केले.
सुभाष घई आपल्याच ब्लॉकबस्टर सिनेमांचे रिमेक करणार
जुन्या सिनेमांचे रिमेक बनवून चित्रपट प्रदर्शित करण्याच्या लाटेत आता दस्तुरखुद्द सुभाष घई उडी घेताहेत. विशेष म्हणजे १९८० च्या दशकातील आपल्याच ब्लॉकबस्टर सिनेमांचे ते रिमेक करणार आहेत.
First published on: 22-05-2013 at 09:16 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Remakes by the maker