उघडय़ावर मांस विक्री करणाऱ्यांची दुकाने कायमस्वरूपी हटवावीत, इतर अवैध धंदे, अतिक्रमण काढावे, दुर्गानगर त्रिमूर्ती चौक ते कामटवाडे, अंबड रस्त्याचे रुंदीकरण करून रहदारीची समस्या सोडवावी, महापौर निधीतून दुर्गानगर उद्यानात ज्येष्ठ नागरिक कट्टा तयार करावा, उद्यान नूतनीकरण करावे आदी मागण्यांचे निवेदन महापौर अॅड. यतिन वाघ यांना सिडको येथील स्वानंद व फेसबुक ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने देण्यात आले. महापौरांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या आश्वासनांना यानिमित्ताने ज्येष्ठ नागरिकांनी उजाळा दिला.
दुर्गानगर येथील स्वानंद ज्येष्ठ नागरिक संघ व फेसबुक ज्येष्ठ नागरिक संघाच्या शिष्टमंडळाने चेतन पणेर यांच्या नेतृत्वाखाली महापौरांची भेट घेतली. महिन्यापूर्वी महापौरांनी प्रत्यक्ष दौरा करून दुर्गानगर त्रिमूर्ती चौक येथील नागरिक तसेच स्वानंद ज्येष्ठ नागरिक संघास समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी स्वानंद ज्येष्ठ नागरिक संघाने पुढाकार घेऊन प्रलंबित मागण्यांविषयी निवेदन देऊन महापौर वाघ व मनपा अधिकाऱ्यांशी थेट चर्चा केली. या वेळी महापौर निधीतून ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या १५ दिवसांत मार्गी लावण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. महापौरांना भेटलेल्या शिष्टमंडळात स्वानंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चेतन पणेर, उपाध्यक्ष सुधाकर पांडे, सुधाकर सोनवणे, सरचिटणीस सुधार दंडगव्हाळ आदींचा समावेश आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा