नगरपालिकेच्या आरोग्य समितीचे सभापती नयनकुमार तथा बब्लू वाणी यांना राजकीय असुयेतून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ उद्या (रविवार) सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपींवर कायदेशीर कारवाई व्हावी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव बिपीन कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी मोर्चा नेण्यात आला. दरम्यान दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
वाणी यांच्यावर शुक्रवारी रात्री सात ते आठ लोकांनी हल्ला करून त्यांना जबर मारहाण केली. नगरपालिकेच्या सभेतील वादळी चर्चेचा राग मनात धरून वाणी यांच्यावर सात-आठ व्यक्तींनी शुक्रवारी रात्री हल्ला करून त्यांना जबर जखमी केल्याचे सांगण्याते येते. काही नागरिक मदतीसाठी येताना पाहून हल्लेखोरांनी येथून पळ काढला होता. दुचाकी येथे टाकून ते पळून गेले. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने नितीन आनंद राऊत व महेंद्र बाळासाहेब सुपेकर या दोघांना ताब्यात घेतले आहे.
वाणी यांनी सांगितले की, पालिका सभेत विविध विषयांवर नेहमीच वाद होतात, परंतु त्याचा राग काढण्यासाठीच मला मारहाण करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी आपण कोणतेही अनुद्गार काढले नाहीत. ज्या वेळी घटना घडली असे सांगितले जाते त्याचवेळेस विरोधी नगरसेवक दिनार कुदळे यांनी निषेद का केली नाही, असा सवाल करून सहा दिवसांनी रस्त्यावर येऊन केवळ मला बळीचा बकरा बनविण्याचा कुटील डाव खेळला आहे. महात्मा फुले यांच्याबद्दल मला आदर आहे. या कथित घटनेला राजकीय द्वेषाचे वळण देऊ नये व जनतेस वेठीस धरू नये असे आवाहन वाणी यांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा