भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज शिवाजी चौक येथे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या बेजबाबदार आणि िहदू जनतेच्या अपमानजनक वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ास ‘शॉक ट्रिटमेंट’ देऊन पुतळय़ाचे दहन करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन संतोष गायकवाड, संदीप देसाई, अमोल बुचडे, मकरंद भालकर आदींनी केले. शिवाजी चौक येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव, नगरसेवक आर. डी. पाटील, राहुल चिकोडे, विजय जाधव, संदीप देसाई, संतोष भिवटे, सुभाष रामुगडे, अशोक देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सुशीलकुमार शिंदे यांच्या हिंदू विरोधी वक्तव्याचा कार्यक्रम घेण्यात आला.
शिवाजी चौक येथे सुशीलकुमार शिंदे यांचा प्रतीकात्मक पुतळा अॅम्ब्युलन्समधून आणून भररस्त्यात स्ट्रेचरवर ठेवून त्यास जमलेल्या कार्यकर्त्यांनी फुलबाजाच्या स्पार्कने ‘शॉक ट्रिटमेंट’ देऊन त्यांची बुद्धी सुधारण्याचा कार्यक्रम केला. यानंतर त्यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन करण्यात आले. या वेळी मोठय़ा प्रमाणात जमलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निषेधाच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. या वेळी जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी शिंदे यांच्या वक्तव्याचा निषेध करून ते म्हणाले, शिंदे हे सरकारचे प्रतिनिधी आहेत की काँग्रेस श्रेष्ठींचे हे ते विसरले असावेत. काँग्रेस नेत्यांचे लांगूलचालन करण्यासाठी आणि नेत्यांचे लक्ष वेधण्यासाठी खोटा आरोप करून सुशीलकुमार शिंदे हे पक्षात मोठे झाले आहेत.
हिंदू समाजास आणि भाजपस दहशतवादी म्हणण्याचे दुष्कृत्य त्यांनी केले आहे, याबद्दल त्यांचा निषेध करावा तेवढा अपुरा आहे. अशोक देसाई म्हणाले, सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन हिंदू जनतेची माफी मागण्याची मागणी केली. या कार्यक्रमावेळी देवेंद्र जोंधळे, अशोक देसाई, मामा कोळवणकर, मधुमती पावनगडकर, तेजस्विनी हराळे, संतोष कारंडे, पपेश भोसले, डॉ. शेलार, राजेंद्र कोतेकर, दिलीप मैत्राणी, अमोल पालोजी, श्रीकांत घुंटे, विजय यादव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.