‘ग. रा. भटकळ फाऊंडेशन’तर्फे १५ वर्षांपूर्वी प्रकाशित केलेल्या ‘संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश’ आणि ‘संज्ञा संकल्पना कोश’ यांचे पुनर्मुद्रण करण्यात येणार आहे.
१९९८ ते २००४ या कालावधीत वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर, जया दडकर आणि सदानंद भटकळ आणि विषयानुसार निमंत्रित केलेल्या तज्ज्ञ व्यक्ती यांच्या संपादक मंडळाने अविरत कष्टाने हे कोश तयार केले होते.
मराठी भाषेच्या सुरुवातीच्या काळापासून २००३ पर्यंतच्या इतिहासातल्या महत्त्वाच्या व्यक्ती, ग्रंथ आणि मराठी समीक्षेच्या वापरण्यात येणाऱ्या संज्ञा यांच्यावरच्या सविस्तर आणि विश्वासार्ह नोंदी या कोशांमध्ये उपलब्ध आहे.
मराठी भाषेचे अध्यापन करणारे शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक, समीक्षक, लेखक आणि सर्वसामान्य सुजाण वाचक या सर्वानाच उपयुक्त ठरणाऱ्या या कोशांचे उत्तम स्वागत झाले आणि अल्पावधीतच या कोशाची पहिली आवृत्ती संपली. गेली काही वर्षे हे खंड उपलब्ध नाहीत. मात्र सतत होणाऱ्या विचारणेमुळे या तीनही खंडांचे पुनर्मुद्रण करण्याचे पॉप्युलर प्रकाशनाने ठरविले आहे आणि त्यासाठी प्रकाशनपूर्व विशेष सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे.
पुनर्मुद्रित होत असलेल्या या तीन खंडांची मूळ किंमत पाच हजार रुपये प्रकाशनपूर्व विशेष सवलतीत हे तीनही खंड साडेतीन हजार किमतीस उपलब्ध होत आहेत. प्रकाशनपूर्व सवलत योजना ५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबपर्यंत चालू राहील. २३ सप्टेंबरपासून संचांचे वितरण करण्यास सुरुवात होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा