पुण्यामध्ये दरवर्षी २६ ते ३० जानेवारी या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या लोकशाही उत्सवाचे हे ११ वे वर्ष असून, यंदा या महोत्सवामध्ये सिनेमा, नाटक, चर्चासत्र अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकांनी आपले हक्क मजबूत करण्यासाठी सक्रिय व्हावे आणि आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तत्पर राहावे, असा उत्सव साजरा करण्यामागचा हेतू आहे.
२६ जानेवारी रोजी म्यानमारच्या नेत्या आंग सान सू की यांच्यावर आधारित ‘द लेडी’ हा चित्रपट आणि २८ जानेवारी रोजी ‘लडी नजरीया’ हे नाटक नवी पेठेतील एस.एम.जोशी फाउंडेशन सभागृह येथे दाखवले जाणार आहे. स्त्रियांवरील अत्याचार, आरोग्य सेवा, लहान मुलांना केल्या जाणाऱ्या शिक्षा या विषयांवर शाळा, महाविद्यालये आणि वस्त्यांमधून पोस्टर प्रदर्शने, कवितावाचन, पुस्तक अभिवाचन आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.  नाटक आणि सिनेमा वगळता महोत्सवातील इतर कार्यक्रम सर्वासाठी खुले आहेत. नाटक आणि सिनेमाच्या प्रवेशिकांसाठी अलका (९६८९९०७८३०), अंजली (९९२१२१००११) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा