पंढरपूर गर्दीचे दिवस यात्रेचा कालावधी सोडून रोज विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शनास सोडण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तर दि. १३ जानेवारीपासून संत नामदेव गोपूर या ठिकाणी दररोज पूर्वी प्रमाणे सनई-चौघडा चालू करण्यात येणार आहे. हा निर्णय दि. ७ जाने. रोजी झालेल्या समितीचे बैठकीत घेण्यात आला असे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी सांगितले. मंदिर समितीची बैठक संत तुकाराम भवन येथे झाली. बैठकीस सदस्य बाळासाहेब बडवे, जयसिंह मोहिते पाटील, वसंत पाटील, प्रा. जयंत भंडारे, वा. ना. उत्पात आदी उपस्थित होते. समिती सदस्याची बैठक झाल्यावर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. वारक ऱ्यासाठी जे करता येण्यासारखे आहे ते करणार आहे. माघी यात्रेपासून संत तुकाराम भवन येथे दररोज सायं. ५ वाजता भजन तर ७ वाजता कीर्तन असे कार्यक्रम होणार आहे. मंदिर परिसरात भाविकांना पिण्यास शुद्ध पाणी उपलब्ध करून गैरसोय दूर केली जाणार आहे. ऑन लाइन दर्शन सुविधा चालू करण्यासाठी निविदा काढल्या होत्या. या साठी अस्मिक कन्सल्टंट्स पुणे, खाडीलकर, सांगली, पीयुष सेल्स अॅण्ड सव्र्हि. यांच्याशी चर्चा केली आहे, असे अण्णा डांगे यांनी सांगितले. ऑन लाइन संदर्भात सर्वाशी चर्चा करून दर्शन सोय केली जाईल असे शेवटी सांगितले.
स्थानिक रहिवासी सकाळी विठुरायाचे दर्शन घेऊ शकणार
पंढरपूर गर्दीचे दिवस यात्रेचा कालावधी सोडून रोज विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शनास सोडण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तर दि. १३ जानेवारीपासून संत नामदेव गोपूर या ठिकाणी दररोज पूर्वी प्रमाणे सनई-चौघडा चालू करण्यात येणार आहे. हा निर्णय दि. ७ जाने. रोजी झालेल्या समितीचे बैठकीत घेण्यात आला असे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी सांगितले. मंदिर समितीची बैठक संत तुकाराम भवन येथे झाली.
First published on: 08-01-2013 at 07:23 IST
TOPICSविठ्ठल
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Residence of pandharpur now can take perspective lord vitthal every morning