माजलगाव मतदारसंघात राष्ट्रवादीअंतर्गत गटबाजी उफाळली असून, एका गटाने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आमदार प्रकाश सोळंके यांच्याविरुद्ध तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर, सोळंके समर्थकांनीही उचल खाल्ली. त्यातूनच बाजार समितीचे सभापती राधाकृष्ण होके यांच्याविरुद्ध सोळंकेसमर्थक १५ संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला. या घडामोडींमुळे माजलगावमध्ये राष्ट्रवादीअंतर्गत बंडाळी सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, या ठरावावर ४ फेब्रुवारीला समितीत चर्चा होणार आहे.
बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून भाजप खासदार गोपीनाथ मुंडे यांच्याविरुद्ध सक्षम उमेदवाराचा शोध सुरू असतानाच राष्ट्रवादीअंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. पक्षाध्यक्ष पवार यांनी जिल्ह्य़ातील सर्व नेत्यांची मते स्वतंत्रपणे काही दिवसांपूर्वी जाणून घेतली. याच वेळी माजलगाव मतदारसंघातील पक्षाचे आमदार सोळंके यांच्याविरुद्ध पक्षाच्याच नेत्यांनी स्वतंत्रपणे तक्रारींचा पाढा वाचला. यात माजी आमदार राधाकृष्ण होके, जिल्हाध्यक्ष अशोक डक, माजी सभापती मोहनराव जगताप, माजी उपाध्यक्ष रमेश आडसकर सामील असल्याची चर्चा आहे.
पक्षाध्यक्षांकडे तक्रारींचा पाढा वाचला गेल्याचे लक्षात येताच जागे झालेल्या आमदार सोळंके यांनीही पक्षांतर्गत विरोधकांना अडचणीत आणण्यास सुरुवात केली. पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत तडजोड करून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या होके यांना बाजार समितीचे सभापतिपद देण्यात आले. मात्र, पक्षांतर्गत विरोधी गटाचे नेतृत्व पाटील यांनी केल्यामुळे राष्ट्रवादीच्याच सोळंकेसमर्थक संचालकांनी होके यांच्याविरुद्ध जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल क ेला. या भूमिकेने ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजलगाव मतदारसंघात राष्ट्रवादीअंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. ठराव दाखल झाल्यानंतर तालुक्यातील सोळंके विरोधकांनीही मोच्रेबांधणी सुरूकेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा