एचआयव्ही-एड्स जनजागरणामध्ये युवकांची भूमिका महत्त्वाची असून त्यासाठी युवकवर्गाने पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी केले. आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवकांसाठी आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पध्रेस चांगला प्रतिसाद मिळाला.
महापौर प्रताप देशमुख, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले, डॉ. सालेहा कौसर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कालिदास चौधरी, डॉ. रवि कुलकर्णी, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक कार्यालयाचे देवेंद्र लोलगे, चंद्रकांत यादव, संदीप घोदे, प्रदीप चौधरी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सिंह म्हणाले की, कोणत्याही एचआयव्ही/एड्स संसíगत व्यक्तीविषयी भेदभाव केला जाऊ नये. समाजाचे मन बदलवण्यासाठी युवक वर्गाचा पुढाकार फार महत्वाचा आहे.
युवा दिनानिमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धा ज्ञानोपासक महाविद्यालय मदान ते हनुमान चौक मार्गावर घेण्यात आली. ज्ञानेश्वर पोले, किरण गवते व परमेश्वर यांनी मुलांमध्ये, तर मुलींमध्ये ज्योती गवते, योगिता ढोबळे व यादव यांनी पहिले तीन क्रमांक पटकावले.
कार्यक्रमस्थळी एचआयव्ही/एड्स व इतर आजारांबाबत माहिती पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले. युवा दिनानिमित्त आयोजित शिबिरात ३२ युवक-युवतींनी एचआयव्हीची चाचणी करून घेतली. ३४ युवक-युवतींनी रक्तदान शिबिरात भाग घेतला.

Story img Loader