श्रीशांत आणि कंपनीने केलेल्या ‘मॅचफिक्सिंग’च्या प्रकारामुळे मुंबईत १५ मे रोजी झालेला ‘मुंबई इंडियन्स’ विरुद्ध ‘राजस्थान रॉयल्स’ यांच्यातील सामना म्हणजे फसवूणकच ठरली. त्यामुळे हा सामना बघण्यासाठी आपण खर्च केलेले २० हजार रुपये परत करावेत. अन्यथा न्यायालयात खटला दाखल करीन, असा गर्भित इशारा मलबाल हिलवर राहणाऱ्या रसिकलाल दोशी या ८० वर्षीय वृद्धाने बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना दिला आहे.
पराकोटीचे क्रिकेटवेडे असलेल्या दोशी यांनी १५ मे रोजीचा ‘मुंबई इंडियन्स’ आणि ‘राजस्थान रॉयल्स’ यांच्यातील सामना सहकुटुंब पाहण्याचे ठरविले. त्यांनी स्टेडियमच्या ‘गरवारे स्टॅण्ड’मधील आठ तिकिटे काढली व त्यासाठी २० हजार रुपयेही मोजले. ‘मुंबई इंडियन्स’चे समर्थक असल्यानेच या वेळी मिळालेली संधी दवडायची नाही म्हणून आणि नातवंडांची हौस म्हणून त्यांनी हा आटापिटा केला. परंतु याच सामन्यानंतर ‘राजस्थान रॉयल्स’च्या श्रीशांत, चंडिला आणि अंकित चव्हाण यांना ‘स्पॉट फििक्सग’प्रकरणी अटक करण्यात आली. हा प्रकार म्हणजे आमच्यासारख्या क्रिकेटवेडय़ा आणि हजारो रुपये खर्च करून स्टेडियममध्ये सामने पाहायला प्रेक्षकांची फसवणूकच आहे, असा आरोप करीत दोशी यांनी थेट बीसीसीआयकडेच पैसे परत करण्याची मागणी केली आहे. सट्टेबाज आणि अन्य आरोपी असले प्रकार करून आमच्यासारख्यांचा कष्टाने कमावलेला पसा लुटत असल्याचा आरोप दोशी यांनी केला आहे.
दोशी गेली ५९ वर्षे कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळेच नोटीस धाडताना त्यांनी त्यात तिकिटांचे पसे परत केले गेले नाही, तर न्यायालयात खटला दाखल करण्याचा इशारा बीसीसीआयला दिला आहे. आपला नातू श्रीशांतचा चाहता आहे. मात्र ‘स्पॉट फििक्सग’प्रकरणी त्याला अटक झाल्यानंतर आपण सामन्याच्या तिकिटांसाठी खर्च केलेले पसे नको त्या गोष्टीवर वाया घालविल्याचे दु:ख त्याला झाल्याचे दोशी म्हणतात. ‘मॅच फििक्सग’ वा ‘स्पॉट फििक्सग’ ही फसवणूकच असून बीसीसीआयला तिकिटांचे पसे परत करण्यासाठी पाठवलेली नोटीस हा त्यांचा कायदेशीर अधिकारच आहे, असेही ते आवर्जून सांगतात. विशेष म्हणजे १५ मेचा सामना त्यांनी ‘याचि देही याचि डोळा’ पाहिलेला पहिलाच सामना होता.
१५ मेच्या सामन्याचे पैसे परत द्या, नाही तर खटला भरेन
श्रीशांत आणि कंपनीने केलेल्या ‘मॅचफिक्सिंग’च्या प्रकारामुळे मुंबईत १५ मे रोजी झालेला ‘मुंबई इंडियन्स’ विरुद्ध ‘राजस्थान रॉयल्स’ यांच्यातील सामना म्हणजे फसवूणकच ठरली. त्यामुळे हा सामना बघण्यासाठी आपण खर्च केलेले २० हजार रुपये परत करावेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-05-2013 at 12:34 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Return money of 15 may match other wise i will fill a petition