कल्याण रेल्वे स्थानकाजवळील एका प्रामाणिक रिक्षा चालकाने रिक्षात नजरचुकीने राहिलेली एका प्रवाशाची एक लाख साठ हजार रुपयांची रक्कम परत केली. सांगली जिल्ह्य़ातील इस्लामपूर येथील विशाल रावल आपल्या भावाच्या लग्नासाठी साहित्य खरेदीसाठी कल्याणमध्ये रविवारी आले होते. सोबत एक लाख साठ हजार रुपयांची रक्कम एका पिशवीत होती. कल्याण रेल्वे स्थानकात लालचौकीकडे जाणाऱ्या रिक्षामध्ये विशाल रावल बसले. उतरताना ते पैशाची पिशवी घेण्यास विसरले. घरी गेल्यानंतर पैशाची पिशवी रिक्षात विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. दरम्यानच्या काळात रिक्षाचालक दानिश खोत यांना रिक्षात एका प्रवाशाची पिशवी विसरल्याचे लक्षात आले. त्यांनी ती कल्याण रेल्वे स्थानकाजवळील रिक्षा संघटनेच्या कार्यालयात आणून दिली. पोलीस आणि रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही पैशाची पिशवी विशाल रावल यांना परत केली.
संग्रहित लेख, दिनांक 19th Apr 2014 रोजी प्रकाशित
रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा; एक लाख ६० हजारांची रोकड परत
कल्याण रेल्वे स्थानकाजवळील एका प्रामाणिक रिक्षा चालकाने रिक्षात नजरचुकीने राहिलेली एका प्रवाशाची एक लाख साठ हजार रुपयांची रक्कम परत केली.
First published on: 19-04-2014 at 02:35 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rickshaw drivers integrity 1 lakh 60 thousand cash return back