घरात एकटी असल्याचे पाहून एका गतिमंद तरुणीवर बलात्कार केल्याबद्दल अप्पा वसंत नरोटे (वय २५) व बाळू निवृत्ती जाधव (वय ५०, रा. ढोराळे, ता. बार्शी) या दोघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश कल्पना व्होरे यांनी प्रत्येकी दहा वष्रे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली.
बार्शी तालुक्यातील वैराग येथे राहणारी २४ वर्षीय पीडित गतिमंद मुलगी १ ऑगस्ट २०१२ रोजी ढोराळे येथे गेली होती. सायंकाळी घरात एकटी असताना आरोपी अप्पा नरोटे व बाळू जाधव हे दोघे तिच्या घरी आले. आरोपी अप्पा याने तिला, तू माझी पत्नी आहेस, असे सांगून तिच्यावर बलात्कार केला होता. हा प्रकार तिने आपल्या आई-वडिलांना सांगितला. तेव्हा वैराग पोलीस ठाण्यात अप्पा नरोटे व बाळू जाधव यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आले. पोलिसांनी तपासाअंती आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश कल्पना व्होरे यांच्यासमोर झाली. सरकार तर्फे अॅड. शैलजा क्यातम यांनी सात साक्षीदार तपासले. यात पीडित तरुणी व तिच्या आई-वडिलांसह वैद्यकीय अधिकारी व पोलीस तपास अधिका-यांचे साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने आरोपीविरुद्ध पुरावा आढळल्याने त्यांना दोषी धरून शिक्षा सुनावली. आरोपी तर्फे अॅड. राजेंद्रसिंह बायस यांनी बचाव केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा