अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अतुल संताराम कांबळे (वय ३२ रा. मालेमुडिशगी) यास दोषी ठरवून इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. ए. ए. शहापुरे यांनी सात वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड, दंड न दिल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. अतुल कांबळे याने अल्पवयीन मुलीस जीवे ठार मारण्याची व तिची बदनामी करण्याची धमकी देऊन १८ ऑक्टोबर २०१० रोजी तिला मजले येथील नॅशनल लॉज येथे नेऊन बलात्कार केला. या प्रकरणी मुलीच्या आईने हातकणंगले पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कांबळे यास अटक केली होती. त्याच्यावर गुन्हा दाखल करून इचलकरंजी येथील न्यायालयात जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी सुरू झाली. यामध्ये १२ साक्षीदार तपासण्यात आले. निकाल देताना वैद्यकीय अधिकारी चंद्रकांत लाटकर व पीडित आई-वडिलांची साक्ष ग्राह्य मानून व सरकारी वकील ऐलान मुजावर यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली.
बलात्कारप्रकरणी सक्तमजुरी
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अतुल संताराम कांबळे (वय ३२ रा. मालेमुडिशगी) यास दोषी ठरवून इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. ए. ए. शहापुरे यांनी सात वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड, दंड न दिल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. अतुल कांबळे याने अल्पवयीन मुलीस जीवे ठार मारण्याची व तिची बदनामी करण्याची धमकी देऊन १८ ऑक्टोबर २०१० रोजी तिला मजले येथील नॅशनल लॉज येथे नेऊन बलात्कार केला. या प्रकरणी मुलीच्या आईने हातकणंगले पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कांबळे यास अटक केली होती. त्याच्यावर गुन्हा दाखल करून इचलकरंजी येथील न्यायालयात जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी सुरू झाली.
First published on: 01-03-2013 at 08:13 IST
TOPICSसश्रम कारावास
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rigorous imprisonment in rape case