अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अतुल संताराम कांबळे (वय ३२ रा. मालेमुडिशगी) यास दोषी ठरवून इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. ए. ए. शहापुरे यांनी सात वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड, दंड न दिल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. अतुल कांबळे याने अल्पवयीन मुलीस जीवे ठार मारण्याची व तिची बदनामी करण्याची धमकी देऊन १८ ऑक्टोबर २०१० रोजी तिला मजले येथील नॅशनल लॉज येथे नेऊन बलात्कार केला. या प्रकरणी मुलीच्या आईने हातकणंगले पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कांबळे यास अटक केली होती. त्याच्यावर गुन्हा दाखल करून इचलकरंजी येथील न्यायालयात जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी सुरू झाली. यामध्ये १२ साक्षीदार तपासण्यात आले. निकाल देताना वैद्यकीय अधिकारी चंद्रकांत लाटकर व पीडित आई-वडिलांची साक्ष ग्राह्य मानून व सरकारी वकील ऐलान मुजावर यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा