अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी एका स्त्रीसह दोघा युवकांना सोमवारी सत्र न्यायाधीश एम. बी. तिडके यांनी दहा वष्रे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. रेश्मा दगडू कांबळे (वय २५, रा. गोकुळ शिरगाव), संदीप जयकुमार कांबळे (वय २४, रा. चिंचवड, ता.शिरोळ), सचिन आदगोंडा िशगे (वय २६, रा.चिंचवड) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
गोकुळ शिरगाव येथे राहणारे रेश्मा कांबळे ही पीडित मुलीच्या चुलत मामाची दुसरी पत्नी आहे. संदीप कांबळे हा रेश्माच्या माहेरकडे राहणारा युवक आहे. त्याच्यावर रेश्माचे अनतिक संबंध होते. ही माहिती पीडित मुलीस असल्याने ती अनैतिक संबंधाची चर्चा गावात करते आणि त्यामुळे रेश्माची अब्रू जाते असा संशय संदीप व रेश्माला होता. ३० मार्च २०११ रोजी पीडित मुलीचे आई-वडील कामाला गेल्याचा गरफायदा घेऊन मुलीस घरी बोलावले. तेथे संदीप कांबळे व सचिन शिगे याने सामूहिक बलात्कार केला. या प्रकाराची वाच्यता केल्यास पोलिसात तक्रार केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. पीडित मुलगी जिवाच्या भीतीने त्या दिवशी गप्प बसली. तथापि दुसऱ्या दिवशी संदीप कांबळे आणि सचिन शिगे यांनी पीडित मुलीच्या घरी जाऊन तिला मारहाण केली. घरातील साहित्याची नासधूस केली. यानंतर रेश्मा, संदीप व सचिन यांच्या विरोधात पीडित मुलीने तक्रार नोंदवली. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस अधिकारी वाय. एम. मोहिते यांनी आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र सादर केले. हा खटला न्यायमूर्ती तिडके यांच्यासमोर चालला. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता एन. बी. आयरेकर यांनी काम पाहिले. एकूण ८ साथीदार तपासण्यात आले. पीडित मुलीची साक्ष, तपासाधिकाऱ्यांची साक्ष, वैद्यकीय पुरावे, सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने संदीप कांबळे व सचिन शिगे यांना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तर याप्रकरणी मदत केल्याबद्दल रेश्मा कांबळे हिला पाच वष्रे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

Story img Loader