कराड-चिपळूण रस्त्यावरील शिरळ (ता. पाटण) गावच्या हद्दीत वडाप जीप व मिनी बसच्या भीषण अपघातात ४ जण ठार ८ जखमी झाल्याप्रकरणी पाटण न्यायालयाने जीपचालक महमद इस्माईल मुकादम (रा. मोरगिरी, ता. पाटण) यास दोषी ठरवून २ वर्षे सक्तमजुरी व १४ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सरकारी वकील संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार ५ फेब्रुवारी २००८ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कराड-चिपळूूण रस्त्यावरील शिरळ (ता. पाटण) गावच्या हद्दीत मिनी बस व वडाप जीपचा अपघात झाला. यामध्ये जीपमधील यशवंत बल्लाळ (वय ३५, रा. जांब), बाळासाहेब माने (वय ४३ रा. कराटे, ता. पाटण), सुनील सुतार (वय २०, रा. लेंडोरी), राधाबाई साळुंखे (रा. झाकडे, ता. पाटण), यांचा मृत्यू झाला. या अपघातात ८ जण जखमी झाले होते. जीपचालक महंमद मुकादम याने स्वत:च्या ताब्यातील जीपमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून संगमनगर धक्का ते पाटण असे घेऊन जात असताना निष्काळजीपणे भरधाव जीप चालविली. त्यामुळे समोरून येणाऱ्या मिनी बसला जीपची धडक बसवून ती रस्त्यात पलटी झाली.
अपघातास कारणीभूत चालकास सक्तमजुरी
बसच्या भीषण अपघातात ४ जण ठार ८ जखमी झाल्याप्रकरणी पाटण न्यायालयाने जीपचालक महमद इस्माईल मुकादम (रा. मोरगिरी, ता. पाटण) यास दोषी ठरवून २ वष्रे सक्तमजुरी व १४ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
First published on: 04-06-2013 at 01:30 IST
TOPICSसश्रम कारावास
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rigorous imprisonment to driver