िहगोली ते कन्हेरगाव नाका रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मंगळवारी शिवनेरी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
िहगोली-नांदेड महामार्गाची वाईट अवस्था झाल्याने हा महामार्ग वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे चच्रेचा विषय ठरला आहे. रस्त्याची दुरवस्था झाल्याने नांदेडला जाणारी वाहने कळमनुरी-आखाडा बाळापूरऐवजी औंढा-वसमत माग्रे जातात. परिणामी अंतर व वेळेत वाढ होते. तसेच मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे झाल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते.
िहगोली शहरातील देवडानगर, शास्त्रीनगर, रिसाला भागात रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे झाल्याने या महामार्गावर अपघात होऊन अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. अपघात झाल्यानंतरच जिल्हा प्रशासनाला जाग येते आणि अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू होते. या पूर्वी अतिक्रमण काढण्यावर लाखो रूपये खर्च झाला. मात्र, पूर्वीपेक्षा अतिक्रमणधारकांची संख्या वाढली. मुख्य रस्त्यावरून प्रशासनाच्या लालदिव्याची वाहने ये-जा करतात. मात्र, हे वरिष्ठ अधिकारी या अतिक्रमणाकडे का डोळेझाक करतात, हा चच्रेचा विषय आहे.
िहगोली ते नाका कन्हेरगाव रस्त्याची १५ दिवसांत दुरुस्ती व्हावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनस्थळी चोख बंदोबस्त होता. दीड ते दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. मनसे जिल्हाप्रमुख बंडू कुटे, संदेश देशमुख, नगरसेवक खय्युम, कडूजी पाटील, किरण डहाळे आदींच्या सह्य़ांचे निवेदन नायब तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वीकारले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा