शहराच्या वेशीतील मारुती मंदिरासमोरील रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले असून, याच पद्धतीने शहराच्या इतर भागांतही पेव्हर ब्लॉक बसविले जाणार आहेत. शहर स्वच्छ व सुंदर दिसावे म्हणून हे काम करण्यात आले आहे, असे प्रतिपादन आ. पंकज भुजबळ यांनी येथे केले.
आ. भुजबळ यांच्या स्थानिक विकास निधीतून सुमारे पाच लाख रुपये खर्च करून मारुती मंदिरासमोरील रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले. त्याचे उद्घाटन भुजबळ यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी राजाभाऊ पगारे होते. वेशीतील दक्षिणमुखी मारुती मंदिर, नीलमणी मंदिर, विठ्ठल मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, बालाजी विठ्ठल मंदिर, बालाजी मंदिर, श्रीराम मंदिर, शनी मंदिर व चाँदशाहवली दर्गा असा हा संपूर्ण परिसर पेव्हर ब्लॉकने सुशोभित करण्यात आला आहे.
 विविध ठिकाणी विजय नाईक, मधुकर बागोरे, पोपट ललवाणी, शांतिलाल पारिक, सुरेश मालपाणी, पारिक बाबूजी, विजय नाईक, प्रकाश कुलकर्णी आदींनी आ. भुजबळ यांचा सत्कार केला. पप्पू परब यांनीही त्यांचा सत्कार केला. नगरसेवक गौतम संचेती यांनी प्रास्ताविक केले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सी. एच. बागरेचा यांनी पिंपळवाडा भागात जैन स्थानक व मशीदसमोरील रस्त्यावरही पेव्हर ब्लॉक बसविण्याची सूचना केली.

Story img Loader