सानपाडा येथे घरफोडी करण्यासाठी आलेल्या चोरटय़ाला तुर्भे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात कोपरखैरणे परिसरातील एका सोनाराला अटक करण्यात आली असून, दोघांकडून सुमारे पाच लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना सानपाडा गावात घरफोडी करण्यासाठी एक जण येणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली होती. माहितीवरुन सेक्टर ५ येथील स्मशानभूमीजवळ आलेला गोरख म्हात्रे याला अटक करण्यात आली होती. कोपरखैरणे पोलिसांनी त्याला दोन वर्षांकरिता तडीपार केले होते. तुर्भे, रबाळे, ठाणे, मुरबाड आणि रत्नागिरी आदी ठिकाणी २० घरफोडय़ा त्याने केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी २ लाख २ हजार ५५० रुपये किमतीचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने आणि दागिने विक्रीतून आलेली २ लाख ९५ हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली. यापूर्वीचे दागिने कोपरखैरणे येथील लक्ष्मण कुमावत या सोनाराला विकल्याची कबुली त्याने दिली असून, या प्रकरणात कुमावत यालादेखील अटक करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा