उत्तर प्रदेशातील एका मंत्र्याच्या नातेवाईकाच्या बोरिवली पश्चिम येथील गोराईतील बंगल्यातून सुमारे ८९ लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची बाब उघड झाली आहे. याशिवाय या नातेवाईकाच्या मालकीचे रिव्हॉल्व्हरही दहा जिवंत काडतुसांसह चोरटय़ाने लांबविले आहे. या बंगल्यातील गाडी धुणारा इसम तेव्हापासून गायब असल्यामुळे त्याच्यावर पोलिसांनी संशय व्यक्त केला असून त्याचा शोध सुरू केला आहे. संपूर्ण कुटुंबीय कुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेशात गेलेले असताना ही घरफोडी झाली.
गोराई येथील मंगलमूर्ती जंक्शनजवळील बंगल्यात शिवमनी मिश्रा राहतात. २८ जानेवारी रोजी ते कुटुंबीयांसह उत्तर प्रदेशात कुंभमेळ्यासाठी गेले होते. रविवारी रात्री ते घरी परतले तेव्हा बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप फोडले असल्याचे आढळून आले. घरातील कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने, काही रोकड असा सुमारे ८९ लाखांचा ऐवज लुटला गेल्याचे त्याच्या निदर्शनास आले. याशिवाय उत्तर प्रदेशातून जारी झालेले अखिल भारतीय शस्र परवाना असलेले रिव्हॉल्व्हर चोरीला गेल्याचेही स्पष्ट झाले आहे. मात्र नियमानुसार असे शस्त्र घरी ठेवताना त्याची मुंबई पोलिसांकडे नोंद ठेवणे आवश्यक असते. परंतु तशी नोंद केली नसल्याचेही आढळून आले आहे.

Story img Loader