खंडाळा येथील दिवाणी न्यायाधीश व प्रथम वर्ग दंडाधिकारी न्या. एन. एस. शिंदे यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात इसमांनी ८२ हजाराचा माल चोरून नेला. याबाबत खंडाळा पोलिसांनी सांगितले की, बुधवार दि. २१ रोजी सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान आदित्य अपार्टमेंट या सदनिकेत रहात असणारे न्या. एन. एस. शिंदे यांच्या निवासस्थानचा कडी कोयंडा तोडून अज्ञात इसमांनी कपाटाचे ड्रॉवर व गोदरेज कपाट फोडले. कपाटातील एच. पी. कंपनीचे ५० हजार किमतीचे २ लॅपटॉप, दीड तोळ्याची सोन्याची चेन, रोख रु. २० हजार, निकॉन कंपनीचा १२ हजार किमतीचा कॅमेरा, स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेक बुक असा एकूण ८२ हजाराचा माल चोरून नेला. बापू शिवराम बडेकर (वय २७ मल्हार पेठ, सातारा) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Story img Loader