शहरात लहान-मोठय़ा चोऱ्यांचे सत्र सुरूच असून सुट्टय़ांमुळे घर बंद करून बाहेर जाणेही नागरिकांना जीकिरीचे होऊ लागले आहे. सिडको भागात बंद घरातून चांदीची भांडी, शिक्के व नाण्यांसह सव्वादोन लाखांचा ऐवज चोरटय़ांनी लुटून नेला. यात रोख २५ हजार रुपयांचा समावेश आहे. मुकुंदवाडी पोलिसांत याबाबत नोंद करण्यात आली.
जितेंद्रसिंग बाबुलाल बुनलिया (वय ६५, एन ३ सिडको, प्लॉट नं. २९२, पहिला मजला) यांनी याबाबत फिर्याद दिली. बुनलिया यांच्या मुलाच्या घरी (प्लॉट नं. ३३) ही चोरी झाली. रोख रकमेसह सहा ग्लास, १२ शिक्के व सुपारीची पेटी असा चांदीचा साडेतीन-चार किलोचा ऐवज चोरटय़ांनी लांबविला. सोमवारी रात्री आठ ते मंगळवारी सकाळी पावणेदहाच्या दरम्यान कधी तरी ही चोरी झाली. दिवाळीच्या दरम्यान व नंतरही शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, पोलिसांपुढे तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा