यवतमाळ-नांदेड जिल्ह्य़ाच्या सीमेवरील माहुरजवळ शेतजमीन खरेदी करण्यासाठी पुण्याहून आलेल्या तीन जणांच्या स्कॉर्पिओ गाडीला अडवून त्यांच्याजवळील पाच लाख रुपये असलेली बॅग भामटय़ांनी लांबवल्याची घटना महागाव तालुक्यातील हिवरदरीजवळ मंगळवारी घडली.
पुणे जिल्हय़ातील जेजुरी येथून गणेश भोसले, नितीन धोत्रे.अमित भिसे हे स्कॉर्पिओ (एमएच १२, एमएस-१४७७) गाडीने माहुरजवळ शेतजमीन खरेदी करण्यासाठी आले होते. हिवरदरीजवळ त्यांची गाडी थांबली असताना तीन मोटार सायकलींवर सहा तरुण तेथे आले आणि त्यांनी स्कॉर्पिओमधील ५ लाख रुपये असलेली बॅग हिसकावून घेऊन फरार झाले, मात्र या मोटार सायकल स्वारांचा स्कॉर्पिओने पाठलाग केला तेव्हा घाबरून त्या सहाही आरोपींनी आपल्या तिन्ही मोटारसायकली रस्त्यात टाकून बॅग घेऊन पळ काढला. घटनेची माहिती ठाणेदार वैद्यनाथ लटपटे यांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा