घराच्या खिडकीचे ग्रील वाकवून आतील ७० हजारांची रोख रक्कम, तसेच १ लाख ४० हजारांचे दागिने पळविल्याची घटना शहराच्या कृषीनगर भागात घडली. ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला.
तोतया महिला पोलिसास अटक
पोलीस असल्याची बतावणी करून अहमदपूर शहरात घरातून सुमारे ५७ हजार रुपयांचे दागिने चोरणाऱ्या सोनाक्षी सूरनर या महिलेस पोलिसांनी अटक केली. सुनेगाव सांगवी (तालुका अहमदपूर) येथील सोनाक्षी सूरनर ही तोतया पोलीस अहमदपुरातील महात्मा गांधी महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी फिरायला जात असे. शहरातील व्यंकटराव गुडमे यांच्या मुलीशी तिने ओळख वाढवली व चहाला घरी गेल्यानंतर गुडमे यांच्या पत्नीस माळेगाव यात्रा सुरू असून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अंगावरील दागिने काढून ताब्यात ठेवा, अशी सूचना केली व तिने डबा पळवला. बसस्थानकातील सहायक वाहतूक नियंत्रक सिद्धेश्वर रासुरे व गांधी चौक पोलीस ठाण्यातील पोलिसांनी संशयास्पद वर्तनावरून तिला ताब्यात घेत अहमदपूर पोलिसांच्या हवाली केले.
लातुरात दोन लाखांची घरफोडी
घराच्या खिडकीचे ग्रील वाकवून आतील ७० हजारांची रोख रक्कम, तसेच १ लाख ४० हजारांचे दागिने पळविल्याची घटना शहराच्या कृषीनगर भागात घडली. ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. तोतया महिला पोलिसास अटक
First published on: 17-01-2013 at 01:29 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbery of two lakhs in latur