शहरात महिन्यापासून पुन्हा दिवसातून तीन वेळा वीज भारनियमन सुरू झाल्याने नागरिक संतप्त झाले असून भारनियमन रद्द करण्यासाठी  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
कार्यकारी अभियंता विनोद सोनकुसळे यांच्यासह अधिकाऱ्यांची या मोर्चामुळे धावपळ उडाली. दुपारी एक वाजता येथील महावितरणच्या कॅम्प विभागातील कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयावर रिपाइं कार्यकर्ते चाल करून गेले. रात्रीच्या अन्यायकारक भारनियमनाविरुद्ध जाब विचारत घोषणाबाजी केली. गणेशोत्सवापूर्वी भारनियमन तातडीने रद्द करावे, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा रिपाइंच्या नेत्यांनी दिला.

Story img Loader