उसाला पहिली उचल २ हजार ६०० रुपये जाहीर करून इचलकरंजीच्या पंचगंगा सहकारी साखर कारखान्याने दरामध्ये बाजी मारली आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन थांबल्यापासून साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. बहुतेक कारखान्यांनी २ हजार ५०० रुपयांची विनाकपात उचल जाहीर केली आहे. पंचगंगा कारखान्याने मात्र २ हजार ६०० रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गतवेळी गाळप झालेल्या उसाला १०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षीपासून पंचगंगा कारखाना रेणुका शुगर्स या कंपनीमार्फत चालवला जात आहे.
दरम्यान या कारखान्याने गत हंगामातील २०० उचल द्यावी, यासाठी गेल्या महिन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जोरदार आंदोलन केले होते. कारखान्यात घुसून रेणुका शुगर्सच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याबरोबरच कारखान्यातील फर्निचर, काचा यांची प्रचंड नासधूस केली होती. याची दखल घेत पंचगंगेच्या वतीने अवघे १००रुपये देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
पंचगंगा कारखान्याकडून सव्वीसशे रुपये उचल
उसाला पहिली उचल २ हजार ६०० रुपये जाहीर करून इचलकरंजीच्या पंचगंगा सहकारी साखर कारखान्याने दरामध्ये बाजी मारली आहे.
First published on: 27-11-2012 at 09:34 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rs twenty six hundred advance by panchganga factory