उसाला पहिली उचल २ हजार ६०० रुपये जाहीर करून इचलकरंजीच्या पंचगंगा सहकारी साखर कारखान्याने दरामध्ये बाजी मारली आहे.    शेतकऱ्यांचे आंदोलन थांबल्यापासून साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. बहुतेक कारखान्यांनी २ हजार ५०० रुपयांची विनाकपात उचल जाहीर केली आहे. पंचगंगा कारखान्याने मात्र २ हजार ६०० रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गतवेळी गाळप झालेल्या उसाला १०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षीपासून पंचगंगा कारखाना रेणुका शुगर्स या कंपनीमार्फत चालवला जात आहे.
दरम्यान या कारखान्याने गत हंगामातील २०० उचल द्यावी, यासाठी गेल्या महिन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जोरदार आंदोलन केले होते. कारखान्यात घुसून रेणुका शुगर्सच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याबरोबरच कारखान्यातील फर्निचर, काचा यांची प्रचंड नासधूस केली होती. याची दखल घेत पंचगंगेच्या वतीने अवघे १००रुपये देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा