रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक मधुकरराव नरसिंह जोशी यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. मधुकरराव मूळचे ठाण्याचे रहिवासी होते. त्यांनी शिशू वयापासून स्वयंसेवक असून रा. स्व. संघाचे ते प्रचारक होते. गेली सहा वर्षे देवगिरी प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत होते. संघाचा कणा असलेला कार्यकर्ता, कार्यपद्धती यावर त्यांचे सखोल चिंतन होते. पुष्पनगरी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी मराठवाडय़ातून मोठय़ा संख्येने संघ कार्यकर्ते उपस्थित होते.

Story img Loader