‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’मार्फत उत्तराखंडामध्ये मदतकार्यासाठी आर्थिक निधी उभारण्यात येणार आहे.
उत्तराखंडात झालेल्या भयावह पावसामुळे हजारो यात्रेकरू ठिकठिकाणी अडकून पडले होते. आता या ठिकाणी सर्वत्र गाळाचे साम्राज्य पसरले आहे. अशा परिस्थितीत यात्रेकरूंना सुखरूप ठेवण्यात, भुकेलेल्यांना अन्न-पाणी पुरविण्यासाठी हा मदत निधी उभारण्यात येणार आहे. संघाने उत्तरांचलात सेवाकार्ये सुरू केली आहेत. यामध्ये यात्रा मार्गातील अति दुर्गम भागात अडकलेल्यांना सुखरूपपणे संपर्क केंद्रांवर आणून त्यांच्या निवासाची सोय केली जात आहे. यात्रा मार्गावरही अन्नपाणी पुरविण्यात शेकडो स्वयंसेवक कायर्रत झाले आहेत. रोज किमान हजारांहून अधिक जणांची भोजनाची व्यवस्था विविध केंद्रांवर केली जात आहे. डेहराडून केंद्रातून अनेक यात्रेकरूंना सुखरूपपणे घरी पाठविण्याची सोय केली आहे.
अशा कामाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. परिसराच्या पुनर्वसनाचे कामही हाती घ्यावे लागणार आहे. या कामासाठी अर्थातच मोठय़ा प्रमाणावर धनशक्ती लागणार आहे.
या करिता जास्तीत जास्त दानशुरांनी या सेवाकार्यात सहभाग घेऊन निधी, रोख किंवा धनादेशाद्वारे रा.स्व. संघ जनकल्याण समितीच्या बँक खात्यावर जमा करावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
अशा प्रकारे खात्यावर परस्पर निधी भरल्यास संपूर्ण नाव, पत्ता, सेलफोन क्रमांक, पॅन क्रमांक rssjankalyan@yahoo.co.in या मेलवर पाठविल्यास या निधीची पावती देणे शक्य होईल. निधी पाठविण्यासाठी तपशील – नाव रा.स्व. संघ जनकल्याण समिती, बँकेचे नाव बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा-टिळक रोड, पुणे, खाते क्रमांक – २००५७१०३८५२, आयएफएसई कोड – एमएएचबी ०००००४१. अधिक माहितीसाठी संपर्क झ्र् ९९६७८९७८५०

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा