सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात डॉक्टर, तंत्रज्ञ आणि कामगारांची मोठी आहे. यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षकांकडे अनेक वेळा तक्रार करून, तसेच पालिका सभागृहात मुद्दा उपस्थित करूनही या प्रश्नाकडे कानाडोळा करण्यात येत असल्यामुळे सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेविकेला अतिरिक्त आयुक्तांकडे धाव घ्यावी लागली आहे.
सांताक्रूझ आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांसाठी हे रुग्णालय मोठा आधार आहे. मात्र या रुग्णालयात डॉक्टर, तंत्रज्ञ आणि कामगारांची संख्या कमी आहे. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना भूलतज्ज्ञ आणि स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे खासगी रुग्णालयात पाठविले जाते.
शिवसेनेच्या नगरसेविका पूजा महाडेश्वर यांनी या संदर्भात वैद्यकीय अधीक्षकांकडे अनेक वेळा तक्रारी केल्या. तसेच प्रभाग समिती, पालिका सभागृहातही हा मुद्दा उपस्थित केला. परंतु अद्यापही या रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे आता पूजा महाडेश्वर यांनी अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांना पत्र पाठवून रुग्णांचे गाऱ्हाणे मांडले आहे. या रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी यावे, असे साकडे त्यांनी म्हैसकर यांना पत्रात घातले आहे.
रुग्णालयातील असुविधेबाबत सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविकेचे प्रशासनास साकडे
सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात डॉक्टर, तंत्रज्ञ आणि कामगारांची मोठी आहे. यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षकांकडे अनेक वेळा तक्रार करून, तसेच पालिका सभागृहात मुद्दा उपस्थित करूनही या प्रश्नाकडे कानाडोळा करण्यात येत असल्यामुळे सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेविकेला अतिरिक्त आयुक्तांकडे धाव घ्यावी लागली आहे.
First published on: 18-05-2013 at 12:09 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ruling party corporator rushed to administration for inconvenience in the hospital