येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ. डॉ. अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांना संगमनेर येथील अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था अमृतनगर या संस्थेचा ‘स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार’ सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात होते.
संगमनेर येथील अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था, अमृतनगर ही संस्था दरवर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांचा १२ जानेवारी हा जन्मदिन ‘प्रेरणादिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आयोजित समारंभात ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर व विधानसभा सदस्य आमदार सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार डॉ. सा. रे. पाटील यांना स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ५१ हजार रुपये, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

Story img Loader