महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल उद्या, १७ जूनला दुपारी १ वाजता ‘ऑनलाईन’ जाहीर करण्यात येणार आहे. दहावीच्या परीक्षेत नागपूर विभागीय मंडळातून २ लाख ५ हजार ०१६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यात पुनर्परीक्षार्थी २८ हजार २०८ तर, नियमित विद्यार्थी १ लाख ७६ हजार ८०८ आहेत.
नियमित आणि पुनर्परीक्षार्थी भंडाऱ्यातून २६ हजार ६६५, चंद्रपूरमधून ३६ हजार ९१७, नागपूरमधून ८० हजार ९५७, नागपूर ग्रामीण ३४ हजार ७७७, वध्र्यामधून २३ हजार ५१६, गडचिरोलीमधून १७ हजार ४४८, तर गोंदियामधून २५ हजार ८४३ विद्यार्थ्यांंनी परीक्षा दिली. बारावीत ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांंना ऑनलाईनची सुविधा उपलब्ध झाली नसल्यामुळे निकालापासून वंचित राहावे लागले होते. मात्र, दहावीच्या निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहण्यासाठी सर्व ग्रामीण भागातील ग्रामपंचायत पासून विविध शासकीय कार्यालयात व शाळांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांंना अडचण जाणार नाही. इंटरनेटच्या माध्यमातून गुणपत्रिकेची प्रत काढण्याची मुभा देण्यात आली असली, तरी ती ग्राह्य़ धरण्यात येणार नाही. गुणपडताळणी, फेरमूल्यांकन, श्रेणीसुधार आदी कार्यवाहीसाठी मूळ गुणपत्रिकेच्या छायाप्रतीसह दहा दिवसांच्या आत विभागीय मंडळाकडे अर्ज करता येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा