साहित्य-सांस्कृतिक
चतुरंग प्रतिष्ठानच्या ‘पुन्हा एक कलाकार एक संध्याकाळ’ या कार्यक्रमात येत्या १२ मार्च रोजी अभिनेते सचिन खेडेकर सहभागी होणार आहेत. रसिकांना खेडेकर यांच्याशी थेट संवाद साधता येणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी सव्वासात वाजता दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र, दादर (पश्चिम) येथे होणार असून सर्वाना प्रवेश विनामूल्य आहे.
काव्य पुरस्कार जाहीर
यशवंत प्रकाशनातर्फे देण्यात येणाऱ्या नरेंद्र बोडके स्मृती काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. डॉ. रत्नाकर भेलकर यांच्या ‘पारध आणि आयुध’ या काव्यसंग्रहास पहिला पुरस्कार मिळाला आहे. द्वितीय आणि तृतीय पुरस्कारासाठी अनुक्रमे नीता तोरणे (एक ओळ कवितेची)व सद्गुरू पाटील (टचस्क्रिन) आणि संजय बोरुडे (पर्णसुक्त) या काव्य संग्रहांची निवड झाली आहे. स्पर्धेसाठी प्रा. श्रीकृष्ण अडसूळ, प्रा. सुहासकुमार बोबडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
सावरकर यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन
अंदमानमधील निवृत्त मुख्याध्यापक एम. अहमद मुजतबा यांनी लिहिलेल्या हिंदी आणि इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच अंदमान येथे प्रसिद्ध व्याख्याते आणि प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या हस्ते झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इंग्रजी भागात सावरकर यांचे छोटेखानी चरित्र व त्यांच्याबद्दल तात्कालिन नेत्यांनी व्यक्त केलेली मते आहेत. तर हिंदूी पुस्तकात सावरकर यांनी अंदमानमधील सेल्युलर कारागृहात भोगलेल्या यातनांचे चित्रण आहे. हे पुस्तक इन्शा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. या वेळी बोलताना डॉ. शेवडे म्हणाले की, एखाद्या मुस्लिम व्यक्तीने लिहिलेले हे पहिलेच सावरकर चरित्र असावे. दोन पिढय़ांपूर्वी आपले पुर्वज हिंदू होते, असा स्पष्ट उल्लेख लेखकाने अर्पण पत्रिकेत केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा