जैन समाजाची सर्वात मोठी सामाजिक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनच्या नाशिक शाखेने महाराष्ट्र विभागातर्फे पुणे येथे आयोजित सोहळ्यात १० पारितोषिके मिळविली. त्यात सचिन शाह सर्वोत्कृष्ट अध्यक्ष व सचिन गांग सर्वोत्कृष्ट सचिव यांचा समावेश आहे.
संपूर्ण वर्षभरात समाजोपयोगी कार्य केलेल्या शाखांची तसेच पदाधिकाऱ्यांची दखल घेऊन त्यातील सर्वोत्तम पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांना सन्मानित करण्यात येते. पुणे येथील गणेश कला सभागृहात महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष प्रवीण खिवंसरा यांच्या नेतृत्वाखाली पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्यात जैन सोशल ग्रुप नाशिकच्या विक्रांत मेहता (लॉनटेनिस) व जयंती दुगड (बास्केटबॉल) हे उत्कृष्ट बाल क्रीडापटू, उत्कृष्ट कार्यक्रम- पारस लोहाडे, समिती सदस्य- पंकज पाटणी, कमलेश कोठारी, ललित मोदी, तसेच मानाचा कृतज्ञता पुरस्कार मोहन बागमार यांना देण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप शाह, माजी अध्यक्ष शरद शाह, उपाध्यक्ष मोहन बागमार, संचालक मणीलाल शाह आदी मान्यवर उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा