माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या ६९व्या जयंतीनिमित्त दसरा चौकातील शाहू बोर्डिगच्या आवारातून सद्भावना दौडीचा प्रारंभ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून करण्यात आला. या दौडीमध्ये विविध क्षेत्रांतील नागरिक ढोल-लेझीम पथकांबरोबर मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. सद्भावना दौडीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक, महापौर प्रतिभा नाईकनवरे, आमदार सा. रे. पाटील, आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार पी. एन. पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, बजरंग देसाई, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष हिंदुराव चौगुले, नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी व विविध संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या वेळी दसरा चौकातील शाहूमहाराजांच्या पुतळय़ास चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ही सद्भावना दौड दसरा चौक, बिंदू चौक तसेच शहरातील प्रमुख विविध मार्गावरून मिरजकर तिकटीमार्गे संभाजीनगरहून करवीर तालुक्यातील मौजे दिंडनेर्ली या गावी रवाना झाली.

Story img Loader