बोरिवली येथील ज्ञानेश्वरी मराठी ग्रंथालयाला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देण्यात येणारा ‘शं. ना. नवरे साहित्य पुरस्कार’ सुप्रसिद्ध लेखक सुमेध वडावाला रिसबुड यांनी लिहिलेल्या ‘सफाई’ या कादंबरीला घोषित झाला आहे. १,११,१११ रुपये रोख, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
‘सफाई’ कादंबरीत सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवनाचे भेदक चित्रण असून महानगरांतील दलित जाणिवा कादंबरीत समर्थपणे व्यक्त झाल्या आहेत, असे ग्रंथालयाचे संचालक हेमचंद्र नार्वेकर व प्राजक्त सैतवडेकर यांनी म्हटले आहे. शं. ना. नवरे यांच्या स्मृतिदिनी, २१ नोव्हेंबर रोजी हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Nov 2014 रोजी प्रकाशित
‘सफाई’ कादंबरीला शं. ना. नवरे साहित्य पुरस्कार
बोरिवली येथील ज्ञानेश्वरी मराठी ग्रंथालयाला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देण्यात येणारा ‘शं. ना. नवरे साहित्य पुरस्कार’ सुप्रसिद्ध लेखक सुमेध वडावाला रिसबुड यांनी लिहिलेल्या ‘सफाई’ या कादंबरीला घोषित झाला आहे. १,११,१११ रुपये रोख, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
First published on: 08-11-2014 at 01:10 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Safai novel get s n navare award