केवळ आर्थिकदृष्टय़ा दुर्बल असल्याने गुणवंत विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून त्यांना शैक्षणिक मदत करणाऱ्या कल्याण येथील स्पंदन या संस्थेच्या वतीने निधी संकलनासाठी येत्या शनिवारी ८ जून रोजी रात्री साडेआठ वाजता सुप्रसिद्ध गीतकार आणि शायर साहीर लुधीयानवी यांच्या गाण्यांची मैफल आयोजित करण्यात आली आहे. थंडी हवाँए लहरा कें आये, तुम अपना रंजो गम, लागा चुनरी में दाग, रंग और नूर की बारात, तुम ना जाने किस जहाँ में सो गये, ये दुनिया अगर मिल भी जायें तो क्या है, जिंदगी भर नही भुलेंगे ये बरसात की रात, तुम अगर मुझको न चाहों तो कोई बात नही आदी अनेक गाणी या मैफलीत सादर होतीलच, शिवाय त्यांच्या आठवणींनाही उजाळा मिळणार आहे. सुवर्णा माटेगावकर, अली हुसेन, अपर्णा संत, प्रशांत नासेरी हे गायक कलावंत या मैफलीत सहभागी होणार आहेत. संगीत संयोजन केदार परांजपे यांचे असून निर्मिती, संकल्पना आणि निवेदन शलाका गोळे यांचे आहे. गुणवंत विद्यार्थी केवळ गरिबीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांना शैक्षणिक मदत करण्याच्या हेतूने चार वर्षांपूर्वी कल्याण येथील बोरगांवकर टॉवरमधील काही तरुणांनी स्पंदन या संस्थेची स्थापना केली. या संस्थेतर्फे आतापर्यंत तब्बल दीडशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी निधी संकलन करण्यासाठी संस्थेतर्फे दरवर्षी दोन सांगितीक कार्यक्रम आयोजित केले जातात.  गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके, शैक्षणिक साहित्य दिले जाते. तसेच काही विद्यार्थ्यांंचे शुल्कही संस्था भरते. संपर्क- प्रशांत दांडेकर- ९८२०५७८२९८.