नाटय़लेखन कार्यशाळा
बोधी नाटय़ परिषदेची २४ वी बोधी नाटय़लेखन कार्यशाळा येत्या २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी विक्रोळी येथे आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेत नव्या नाटकांचे वाचन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी प्रेमानंद गज्वी-९८२१७७१८८४/अशोक हंडोरे ९१६७९२३३६२ यांच्याशी संपर्क साधावा.     
एकांकिका स्पर्धा
दादर येथील अमर हिंद मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दिवंगत आप्पा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी येत्या १२ ऑक्टोबर रोजी शिवाजी मंदिर येथे होणार आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी नुकतीच अमर हिंदू मंडळ येथे झाली. अंतिम फेरीसाठी सहा एकांकिकांची निवड करण्यात आली आहे. मंडळातर्फे दिवंगत विनोद हडप यांच्या            स्मरणार्थ मराठी एकांकिका लेखन स्पर्धाही घेण्यात आली होती. या दोन्ही स्पर्धाचा पारितोषिक वितरण समारंभ शिवाजी मंदिर येथे १२ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता होणार आहे.
साहित्यिकांचा मेळावा
महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्थेतर्फे येत्या १४ ऑक्टोबर रोजी पनवेल तालुक्यातील साहित्यिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा सायंकाळी ५.३० ते ८.३० या वेळेत के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालय, हिरवे गुरुजी मार्ग, भाजीमार्केट, पनवेल येथे होणार असल्याची माहिती संस्थेच्या पत्रकात देण्यात आली आहे.
यशवंत काव्य अविष्कार
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे महिलांसाठी ‘यशवंत काव्य अविष्कार’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्त्रीचे अस्तित्व, सामाजिक परिवर्तन, पर्यावरण, वैश्विक भान या विषयांवर येत्या २५ ऑक्टोबपर्यंत कविता पाठवायच्या आहेत. अधिक माहितीसाठी ९८६९९२५५३३/९३२४२५६५८८ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
कथासंग्रह प्रकाशन सोहळा
दादर सार्वजनिक वाचनालय आणि मधुमती प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १३ ऑक्टोबर रोजी मधुमती जोगळेकर-पवार लिखित दोन कथासंग्रहांचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव, अशोक मुळे, गंगाराम गवाणकर, नारायण जाधव आदी मान्यवर या वेळी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता दादर (पश्चिम) येथील धुरू सभागृहात होणार आहे.
मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग
मोडी लिपी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे यंदाही  मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. दादरच्या राजा शिवाजी विद्यालय येथे दर शनिवारी संध्याकाळी ५.३० ते ७.३० तर बदलापूर नगरपरिषद शाळेत दर रविवारी  सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत आयोजित करण्यात आले आहेत. इच्छुकांनी कृष्णाजी म्हात्रे यांच्याशी ९८६९४५५४२२ किंवा ९९६९६४४२४८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Story img Loader