शहरातील सुभाष कॉलनी येथे बांधण्यात आलेल्या साई मंदिरात माजी आमदार जयंत ससाणे व त्यांची पत्नी नगराध्यक्षा राजश्री ससाणे यांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. कलशारोहण सोहळा अडबंगनाथ आश्रमाचे मठाधिपती हभप अरुणगिरी महाराज यांच्या हस्ते झाला.
माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे व नगरसेविका राजश्री सोनवणे यांच्या पुढाकाराने, तसेच अष्टविनायक सामाजिक व सांस्कृतिक मंडळ, साईभक्त परिवाराने सुमारे १५ लाख रुपये खर्चाचे भव्य मंदिर बांधले आहे. आमदार भाऊसाहेब कांबळे, नगरपालिकेतील पक्षप्रतोद संजय फंड, ज्येष्ठ नेते अप्पासाहेब कदम, हेरंब औटी, तालुका काँग्रेस अध्यक्ष सचिन गुजर आदी यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी शहरातून श्रीसाई मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली.
अरुणगिरी महाराज यांनी श्रीरामकथेने भाविकांना मंत्रमुग्ध केले. साईबाबांच्या ‘श्रद्धा व सबुरी’च्या संदेशाचे आचरण करा, साईबाबांच्या नामाबरोबरच श्रीराम व हरिनामाचा जप करा, जीवनात यशस्वी व्हाल, असा उपदेश त्यांनी केला.कुठलीही लोकवर्गणी न करता सोनवणे दाम्पत्य व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शहरात एक नवा पायंडा पाडून विधायक कार्य केल्याचे ससाणे यांनी सांगितले. माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी प्रस्ताविक केले. नगरसेविका राजश्री सोनवणे यांनी स्वागत व माजी नगरसेवक सिराजभाई काझी यांनी सूत्रसंचालन केले. आभार विजय शिंदे यांनी मानले.    

Story img Loader