मानवतेचा संदेश देत वैश्विक संस्कृतीचे दर्शन घडविणारे संतसाहित्य हे महाराष्ट्राचे संचित आहे, असे मत साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले. एमआयटी विश्वशांती केंद्रातर्फे आयोजित संत ज्ञानेश्वर-तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमालेचे उद्घाटन डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते झाले. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. कोत्तापल्ले यांचा संस्थेचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सचे (आयसीसीआर) उपाध्यक्ष डॉ. एस. एन. पठाण, विश्वशांती संघाचे कार्यकारी संचालक संजय उपाध्ये, प्राचार्य डॉ. ललित क्षीरसागर, मंगेश कराड आणि डॉ. मिलिंद पांडे या प्रसंगी उपस्थित होते.
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले,‘‘धर्माचा नव्याने विचार करू पाहणाऱ्या संत परंपरेने महाराष्ट्र संस्कृतीचा पाया घातला. व्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न होतो तेव्हा संस्कृती बदलाच्यादृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असते. वेगवेगळ्या जातींच्या लोकांनी केवळ कवितालेखन केले नाही, तर त्यांनी जीवन आणि संस्कृतीविषयीचे आकलन मांडले. नव्या मूल्यांचा प्रस्थापनेसाठीचा संघर्ष हा हळूहळू माणूस वैश्विक संस्कृतीकडे जाईल असा विश्वास संतांना आहे. आपण विचारांनी मार्क्सवादी असाल, देव मानणारे असो किंवा देव न मानणारे; संतसाहित्य हे महाराष्ट्राचे संचित आहे हे सर्वानाच मान्य करावे लागेल. ज्ञानेश्वर हे केवळ संत नाहीत, तर मराठीचे आद्य कवी आणि संस्कृतीचा पाया घालणारे तत्त्वज्ञ आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा