उष्म्यापासून बचावासाठी नागरिकांची शहरातील शीतपेय विक्री केंद्रांवर गर्दी होत असली तरी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून त्यांची तपासणी होत नसल्याने काही ठिकाणी भेसळयुक्त लस्सी, आइस्क्रीम, कुल्फी, पेढे या मालाची सर्रासपणे विक्री होत असल्याचे दिसून येते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने त्वरित कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
लस्सी, आइस्क्रीम, कुल्फी, पेढे तयार करताना त्या मालामध्ये काही जण आरोग्यास घातक अशी वेगवेगळी पावडर व सेंट टाकत असतात. भेसळयुक्त या मालाची सर्रास विक्री केली जाते. उच्चभ्रू स्थितीतील भेसळयुक्त शीतपेय पदार्थ तयार करून माल पुरवठा व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी शहरातून होत आहे.