ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी आर्गनायझेनच्या जिल्हाध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सलीम मेमन यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहेमद अन्सारी यांनी केली आहे. चिखली येथील खरूल्ला शाह बाबाजवळील प्रांगणात डिसेंबरमध्ये झालेल्या शब्बीर अन्सारी यांच्या विशेष उपस्थितीत ऑर्गनायझेशनच्यावतीने जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात हिंदू, मुस्लिम ओबीसी बांधवांना संघटीत करून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या या शासनमान्य सामाजिक संघटनेच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी सलीम मेमन यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी संघटनेचे मिर्झा, निझामी,मोमीन, बागवान, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष खरात, कुरेशी, बारूदवाला, शेख, नगरसेवक मोबीन मियॉं, शाह, हुसेन उपस्थित होते.

Story img Loader