सालेकसा तालुका कृषी कार्यालयातील कर्मचारी शेतकऱ्यांशी अभद्र व्यवहार व भेदभाव करीत असल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.
तालुक्यातील धानोली ग्रामपंचायतीचे सरपंच रतनलाल टेंभरे हे योजनांची माहिती घेण्यासाठी गेले असता पर्यवेक्षक आर.डी. तुरकर व सहायक कृषी सेवक ए.पी. कोल्हाटकर यांनी गरवर्तणूक केली. धानोली ग्रामपंचायतीने सरपंच टेंभरे तालुका कृषी कार्यालयात गावातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना व कृषी औजार व साहित्यांची माहिती जाणून घेण्यासाठी गेले व आलेले साहित्य कशा प्रतीचे आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, पर्यवेक्षक आर.डी. तुरकर व सहायक कृषी सेवक ए.पी. कोल्हाटकर यांनी त्यांच्याशी अरेरावी करण्याचा प्रयत्न केला. जो साहित्य खरेदी करेल त्यालाच दाखवता येते. अन्यथा, तुम्हाला कृषी साहित्य पाहता येत नाही, असे उत्तर देऊन त्यांना परतून लावले.
शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. आधुनिक यंत्र व औजारे पुरविण्यात येतात; परंतु येथील कर्मचारी शेतकऱ्यांशी मुजोरी करून माहिती न देताच परतून लावतात. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांशी भेदभाव करून आपल्याशी संबंधित मोठय़ा शेतकऱ्यांनाच योजनांची माहिती व फायदा करून देत असल्याचा आरोप टेंभरे यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी तालुका कृषी अधिकारी पोटदुखे यांनी सिंचन फवारे १०० टक्के अनुदानावर मिळत असून शेतकऱ्यांना त्यासंबंधी पसे भरायला सांगून मार्चपर्यंत साहित्य मिळेल, असे सांगितले होते; परंतु एप्रिलनंतरही शेतकऱ्यांना सिंचन फवारे मिळाले नाहीत. येथे येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांशी कर्मचारी मुजोरी करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी धानोलीचे सरपंच रतनलाल टेंभरे यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा