कुठे पाणी बचत उपक्रमाची सुरूवात, कुठे आरोग्याविषयी मार्गदर्शन तर काही ठिकाणी गुणवंत महिलांचा गौरव, अशा विविध प्रकारे अनेक संस्था, संघटनांच्या वतीने महिला दिनानिमित्त ‘स्त्री’ शक्तीला सलाम करण्यात आला.
महानगरपालिका, महिला व बालकल्याण समितीच्या वतीने संगीत खूर्ची व रांगोळी स्पर्धेचे आयोजन दादासाहेब गायकवाड सभागृहात करण्यात आले होते. महिला नगरसेविकांसाठी आयोजित संगीत खूर्ची स्पर्धेचे उद्घाटन महिला व बालकल्याण समिती सभापती मनिषा हेकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी महिला व बालकल्याण समिती सदस्या नीलिमा आमले, सविता दलवाणी, रंजना पवार, ललिता भालेराव, शोभना शिंदे, उषा शेळके आदी उपस्थित होते. तर कालिदास कलामंदिरात जिजाऊ महिला सेवाभावी संस्था व नाशिक जिल्हा महिला व बचतगट विकास सहकारी पतसंस्था यांच्या वतीने ‘राजमाता जिजाऊ आत्मसन्मान गौरव पुरस्कार सोहळा’ झाला. प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी समर्थ केंद्राचे अण्णासाहेब मोरे, आ. जयप्रकाश छाजेड, प्रा. यशवंत गोसावी, आकाश छाजेड आदी उपस्थित होते. कावेरी कासार, सुनिता आहेर, सुरेखा जगताप, प्रतिभा सानप, सुनिता अहिरराव, प्रज्ञा रणवीर, दीपाली मुकणे, भैरवी कुंवर, सुनीता पाटील, रुबीना खान, विजया जाधव यांना सन्मानित करण्यात आले. पुरस्कार सोहळ्यानंतर प्रा. गोसावी यांचे ‘जिजाऊ समर्थ वारसा’ विषयावर व्याख्यान झाले. आंतरराष्ट्रीय जल वर्षांनिमितत्त राज्यातील पाणी टंचाई लक्षात घेता ‘थेंब थेंब वाचवू या’ विशेष उपक्रमाची सुरूवात करण्यात आली.
समर्थ महिला मंडळाच्या वतीने लिलावती रूग्णालयात आयोजित आरोग्य शिबीराचे उद्घाटन नगरसेविका सीमा हिरे यांच्या हस्ते झाले. यावेळी संचालिका विजया राऊत, संगीता शिंदे, पुष्पावती भामरे, अनिता देवरे, डॉ. प्रसाद निकम आदी उपस्थित होते. २५ मार्चपर्यंत हे शिबीर सुरू राहणार आहे. रत्नसिंधु मित्र मंडळ आणि लाईफ केअर हॉस्पिटलच्या वतीने महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. लोकनिर्माण प्रकल्प व अश्वमेध सामाजिक संस्थेच्या वतीने गंजमाळ येथे ‘महिला सक्षमीकरण’ मेळावा झाला. मेळाव्याचे उद्घाटन आ. उत्तम ढिकले यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून आ. वसंत गिते उपस्थित होते. यशोदा सामाजिक संस्थेच्या वतीने आशादीप मंगल कार्यालयात महिला मेळावा भरविण्यात आला. तर रावसाहेब थोरात सभागृहात या क्रांतीज्योती महिला सक्षमीकरण संस्थेच्या वतीने मेळावा घेण्यात आला.

Story img Loader