स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रसार व्हावा या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘समर्थ भारत व्यासपीठ’च्या ठाणे केंद्रामध्ये आयोजित करण्यात ओलेल्या वक्तृत्व, नाटय़ आणि चित्रकला स्पर्धा उत्स्फुर्त प्रतिसादात पार पडल्या. येथील आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयात यास्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. समर्थ भारत व्यासपीठच्या ठाणे केंद्राचे अध्यक्ष डॉ. दाऊद दळवी यांच्या हस्ते या स्पर्धाचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा ज्योती जपे, ठाणे केंद्राचे उपाध्यक्ष उल्हास कार्ले, संस्थेचे विश्वस्त रधुनाथ कुलकर्णी, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक सुनील चव्हाण, प्रा. प्रदीप ढवळ, परिक्षक भारती जोशी, जयंत पवार, मेधा सोमण, विद्या नानल, आसावरी फडणीस, सविता स्वार, रोहिणी भावे, आरती नेमाणे, रुपाली विश्वकर्मा आणि प्रगती बाकाडे उपस्थित होते.
यास्पर्धाची प्राथमिक फेरी संस्थेच्या राज्यामधील विविध केंद्रावर घेण्यात येत असून अंतिम फेरी पुणे येथे होणार आहे. अलिकडेच ठाणे येथील केंद्रावर ठाणे, मुंबई आणि कोकण विभागासाठी वकृत्व, नाटय़ आणि चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. शाळा आणि महाविद्यालय अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जवळपास १५० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. पुणे येथे होणाऱ्या अंतिम फेरीत वकृत्व स्पर्धेसाठी कल्याणी सुरवाडे, प्रसाद उगलमुगले आणि आशा गायकवाड तर नाटय़विष्कार स्पर्धेसाठी येथील सरस्वती विद्यामंदीर शाळेतील कलाविष्कार पथक यांची निवड करण्यात आली आहे. वकृत्व स्पर्धेसाठी ‘विवेकानंद एक अलौकिक व्यक्तिमत्व’, ‘भारताच्या विकासासाठी पाश्चात्यांचे अनुकरण नको’ तर नाटय़विष्कार स्पर्धेसाठी विवेकानंदांच्या जीवनावर आधारित प्रसंगनाटय़ हे विषय देण्यात आले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा